भारताचे ‘चांद्रयान २’चे श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने १५ जुलै रोजी होणारं हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज या यानाचे प्रक्षेपण केले. आजच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर अनेकींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

भारत स्पेस पॉवर: सुषमा स्वराज</p>

इस्रो पुन्हा एकदा… :अक्षय कुमार

अभिनंदन सेहवागकडून…

बाहुबली चंद्रयान: मिलिंद देवरा

नवीन जिंदाल

काय छान दृष्य आहे: मोहम्मद कैफ

भारतीयांची स्वप्ने आकाशात झेपावली: रैना

इतिहास घडवणाऱ्यांना सलाम: सदानंद गौडा

दरम्यान, ‘चांद्रयान-२’ मोहिम यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर यान उतरवले आहे.