News Flash

ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत; योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर आरोप

हाथरस येथील घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावरून साधला निशाणा

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, उत्तर प्रदेश सरकारला विरोधकांकडून धारेवर धरण्यात आले आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे मुख्यमंत्री योगी यांनी आदेश दिलेले आहेत. तर, विरोधकांकडून आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ज्यांना विकास आवडत नाही, ते जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

“ ज्यांना विकास आवडत नाही ते लोकं देशात व प्रदेशात जातीय दंगली भडकवू इच्छित आहेत. या दंगलीच्या आड विकास थांबेल व त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधण्याची संधी मिळेल. यासाठीच नवनवीन षडयंत्र रचली जात आहेत. मात्र आम्हाल ही सर्व षडयंत्र ओळखून विकासाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.”

राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या प्रचंड विरोधानंतर काल पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचं भेट घेऊन सांत्वन केलं. यावेळी आझाद यांनी सरकारकडे काही मागण्यांही केल्या आहेत. तर, या अगोदर बसपा अध्यक्षा मायावती यांनी योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये १९ वर्षीय दलित युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 8:20 pm

Web Title: those who do not like development want to provoke communal riots yogi adityanath msr 87
Next Stories
1 “काँग्रेस आता पीआर कंपनी झालीये, तिचा खर्च चिनी देणग्या ते…”; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची टीका
2 जनता त्यांना याची आठवण करून देईल; प्रियंका गांधी यांचा योगी सरकारवर भडकल्या
3 हाथरस प्रकरण : “पीडितेच्या कुटुंबीयांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा त्यांना माझ्या घरी घेऊन जातो”
Just Now!
X