01 March 2021

News Flash

महिलांविरोधी गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायदा करणार : संरक्षण मंत्री

हैदराबादेतील घटनेचे देशभरासह संसंदेतही तीव्र पडसाद

संग्रहीत

हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमट आहेत. याचबरोबर आज संसंदेत देखील या घटेनेचे पडसाद उमटल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली आहे. शिवाय, या घटनेमुळे संपूर्ण देशाला लाज आणली आहे. यामुळे प्रत्येकालाच दुःख झाले आहे. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांविरोधातील अशाप्रकारचे गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कायद्याची निर्मिती करण्यास आहोत, ज्यासाठी संपूर्ण सभागृह देखील सहमत असेल, असे देखील त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी दिले आहेत. शिवाय याप्रकरणी तीन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे. तर केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हैदराबादेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली आहे.

आणखी वाचा- “आरोपींना जनतेसमोर ठेचून मारा”; हैदराबाद घटनेवर जया बच्चन यांचा संताप

समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनाी देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लोकांना सरकारकडून योग्य आणि निश्चित उत्तर हवंय. हैदराबादमध्ये ज्या दिवशी ही घटना घडली, त्याच्या एक दिवस आधी तिथेच एक दुर्घटना घडली. तिथल्या सुरक्षाकर्मींना प्रश्न विचारले गेले पाहिजेत. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावं जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया जया बच्चन यांनी संसदेत दिली आहे.

आणखी वाचा- हैदराबादमध्ये नागरिकांनी नेत्यांना हुसकावले

काय आहे घटना?
हैदराबाद येथे गुरुवारी एका नाल्याजवळ सत्तावीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी ती बेपत्ता झाल्याची तक्रार होती. तिच्या लहान बहिणीने याबाबत पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते, की तिच्या बहिणीचा बुधवारी रात्री ९.२२ वाजता फोन आला होता. ती टोल नाक्यावर अडकून पडली असून कुणीतरी तिला तिच्या स्कूटरचे टायर पंक्चर असल्याचे सांगून मदतीचा प्रयत्न केला. नंतर या सगळ्या प्रकारात मदतीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 2:27 pm

Web Title: to control and eliminate such crimes against women we are ready to make law defence minister msr 87
Next Stories
1 सब लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट
2 “आरोपींना जनतेसमोर ठेचून मारा”; हैदराबाद घटनेवर जया बच्चन यांचा संताप
3 पावसामुळे तामिळनाडूत चार घरे कोसळली, १७ जणांचा मृत्यू
Just Now!
X