१. अध्यक्ष निवडता येत नसेल तर कार्यालयांना टाळे लावा; शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांना टोला
अध्यक्षपदावरुन सध्या काँग्रेस पक्षामध्ये जे काही चालले आहे त्यावर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले असून काँग्रेसच्या नेत्यांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेस रसातळाला जायला गांधी परिवार जबाबदार नाही तर त्याला काँग्रेसचे जुने नेतेच कारणीभूत आहेत, असे त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून म्हटले आहे. वाचा सविस्तर : 

The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

२.स्विस बँकांतील भारतीयांच्या गुंतवणुकीचा लवकरच उलगडा
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ३० सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची २०१८ पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. वाचा सविस्तर :

३.नवनीत राणा यांनी मेळघाटात केलेली पेरणी वादात?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी पेरणी केल्याप्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले असून राणांची ही पेरणी वादात सापडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर : 

४.चर्चा तर होणारच.. : मांजरेकरची वादग्रस्त संघनिवड!

इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीनंतर रवींद्र जडेजाच्या अष्टपैलूत्वाची भारताचा माजी फलंदाज आणि विश्लेषक संजय मांजरेकरने खिल्ली उडवली होती. परंतु जडेजाने मी तुझ्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे, असा दावा करीत त्याला प्रत्युत्तर दिले होते. वाचा सविस्तर :

५.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रनिर्मितीशी संबंध काय, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. भाजप सरकार शिक्षणक्षेत्राचा उपयोग संघ विचारधारेच्या प्रसारासाठी करीत आहे, असा आरोप त्यांनी केला. वाचा सविस्तर :