25 February 2021

News Flash

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

वाचा सकाळच्या महत्वाच्या बातम्या

१. ग्रामीण भागातील नाराजीचा सूर सत्ताधाऱ्यांसाठी त्रासदायक?

कर्जमाफीचा लाभ झाला नाही, दुधाला वाढीव भाव मिळालाच नाही, शेतमालाला पुरेसा भाव मिळत नाही, सरकारची मदत पोहोचलीच नाही, असा एक सरसकट नकारात्मक सूर ग्रामीण भागात शेतकरी किंवा नागरिकांकडून ऐकायला मिळतो. वाचा सविस्तर :

२. ‘लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा’, नरेंद्र मोदींचं मतदान करण्याचं आवाहन
देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. विदर्भातील १० पैकी ७ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. वाचा सविस्तर : 


३. नोटा, दारू, अमली पदार्थाचा सुकाळ ; निवडणूक काळात देशभरातून १९०० कोटींचा मुद्देमाल जप्त
नोटाबंदीनंतरच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत पैशाच्या खैरातीस आळा बसेल हा अंदाज सपशेल खोटा ठरला आहे. निवडणूक आयोगाने देशातील विविध राज्यांमधून गेल्या काही दिवसांत सुमारे ५३० कोटींची रोकड, ७२५ कोटींचे अमली पदार्थ आणि १८६ कोटींची दारू, मौल्यवान वस्तू असा तब्बल १९०८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाचा सविस्तर :


४.‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांची विश्वचषकासाठी इंग्लंडवारी पक्की!
काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने निर्बंध लादले होते. मात्र आता प्रशासकीय समितीने आपल्या भूमिकेत बदल केला असून ज्यांना आयसीसी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल, त्यांच्या इंग्लंडवारीला परवानगी देण्यात आली आहे. वाचा सविस्तर :


५.हिंदुस्थानसारख्या बलाढ्य देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात ही लाजिरवाणी बाब – उद्धव ठाकरे
हिंदुस्थानसारख्या बलाढय़ आणि खंडप्राय देशाला मूठभर नक्षलवादी आव्हान देतात आणि हवा तेव्हा हिंसाचार घडवून दहशत निर्माण करतात ही लाजिरवाणी बाब आहे. मुळात नक्षलवाद्यांपर्यंत इतक्या मोठय़ा प्रमाणात स्फोटके, शस्त्रास्त्र आणि दारूगोळा पोहचतोच कसा? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे. वाचा सविस्तर :

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 10:16 am

Web Title: top five morning news bulletin bcci officials on england tour for the world cup
Next Stories
1 ‘शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली होती, मग राज ठाकरेंच्या नावानं शिमगा का?’
2 नोटा हा पर्याय नाही, योग्य वाटत असेल त्याला मत दिलं पाहिजे – भैय्याजी जोशी
3 Lok Sabha Voting LIVE : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५५.७८ टक्के मतदान
Just Now!
X