१.World Cup 2019 : चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवलं – रवी शास्त्री
विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करणारा भारतीय संघ, उपांत्य सामन्यात न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ढेपाळला. वाचा सविस्तर :

२.आमदार फुटल्याने काँग्रेस चिंताग्रस्त
गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमधील आमदारांनी भाजप वा प्रादेशिक पक्षाची वाट पत्करल्याने काँग्रेस पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच विधानसभेची निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्र आणि हरयाणात पक्षांतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षांतर रोखायचे कसे, असा प्रश्न पक्षाला भेडसावत आहे. वाचा सविस्तर : 

३. मध्य रेल्वेवर आता पाच रुपयांच्या चहाचेही बिल
निश्चित दरांपेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या स्टॉलधारकांना वठणीवर आणण्यासाठी प्रत्येक खाद्यपदार्थ व कुठल्याही वस्तूच्या खरेदीचे बिल ग्राहकाला देणे मध्य रेल्वेने बंधनकारक केले आहे. बिल न देणाऱ्या स्टॉलधारकास पैसे चुकते करण्याची गरज नाही, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर : 


४.फसवणूकप्रकरणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर गुन्हा दाखल
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर फसवणूकप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. एका स्टेज शोसाठी पैसे घेऊनही शो केला नसल्याचा तिच्यावर आरोप आहे. वाचा सविस्तर : 

५.जाणून घ्या आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढी एकादशी म्हटले की आपल्याला माहित असते ती म्हणजे आळंदी ते पंढरपूरची वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या परंपरेवर देशातच नाही तर जागतिक स्तरावरही अभ्यास सुरु आहे. वाचा सविस्तर :