१.राजीव गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानासाठी मोदींना देश कधीही माफ करणार नाही – राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी(दि.4) उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात राजीव गांधींचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. मोदींच्या या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरमार्फत प्रतिक्रिया देताना ‘मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नाही, असं प्रत्युत्तर दिलं होतं. वाचा सविस्तर : 

२.अजयच्या वेडापायी लागले गुटख्याचे व्यसन, झाला कॅन्सर अन् आता म्हणतो…
आजवरच्या कारकिर्दीमध्ये सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगण जाहिरातींच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरही झळकला आहे. अजयने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं असून सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. अजय गेल्या कित्येक काळापासून तंबाखू उत्पादनाच्या जाहिराती करत आहे. वाचा सविस्तर : 


३.प्रियंका गांधी नवऱ्याचं कमी, माझ्याच नावाचा जास्त जप करतायत : स्मृती इराणी<br />प्रियंका गांधी वढेरा यांना गेल्या पाच वर्षात माझं नाव माहिती नव्हतं. मात्र, आता ते सातत्याने माझ्या नावाचा जप करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधींना टोला लगावला आहे. अमेठीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर : 


४.VIDEO: लेकीसाठी कायपण… अर्धशतक साजरे करताना रोहितला झाली समायराची आठवण
आयपीएलमधील शेवटच्या साखळी सामन्यामध्ये मुंबईने कोलकत्त्यावर शानदार विजय मिळवत मागील सामन्यातील पराभवाचा वचपा काढला आणि कोलकत्त्याला यंदाच्या हंगामातून बाहेरचा रस्ता दाखवला. या विजयामुळे रनरेटच्या जोरावर मुंबईने चेन्नईला मागे टाकत गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पुन्हा सूर गवसल्याचे दिसले. रोहितने अर्धशतकीय खेळी करत मुंबईचा विजय सोपा करुन दिला. अर्धशतक केल्यानंतर रोहितने अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने ही खेळी आपली मुलगी समायराला समर्पित केली. वाचा सविस्तर : 

रोहित शर्मा[/caption]

५. ‘जलयुक्त शिवार’ची कामे होऊनही २५ हजार गावे दुष्काळग्रस्त
राज्यात गेल्या पाच वर्षांत सुमारे २५ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार आणि अन्य जलसंधारण योजनांची कामे झाली असताना यंदा सुमारे २४-२५ हजार गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या साडेचार पाच वर्षांमध्ये सुमारे ६० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी सिंचन प्रकल्प आणि जलसंधारणावर खर्च झाला असला तरी दुष्काळ हटलेला नाही. वाचा सविस्तर :