१. तुम्ही माझं बालपण हिरावून घेतलं; जगभरातील नेत्यांवर ग्रेटा थनबर्ग संतापली
हवामान बदल थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे संघात हवामान कृती परिषद सुरू आहे. या परिषदेला आलेल्या जगभरातील नेत्यांवर १६ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने संताप व्यक्त केला. “पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुमच्या पोकळ शब्दांनी माझं बालपण हिरावून घेतलं आहे,” असा आरोप ग्रेटा थनबर्गने केला आहे. वाचा सविस्तर : 

२. अमेरिकेच्या मदतीनं ISI कडून दशतवाद्यांना प्रशिक्षण : इम्रान खान
पाकिस्तानने 1980 मध्ये अमेरिकेच्या मदतीने सोव्हिएत संघाविरोघात जिहाद पुकारला होता. अमेरिकेच्या मदतीनेच आयएसआयने जगभरातील मुस्लीम देशांमधून दहशतवाद्यांना बोलावून सोव्हिएत संघाविरोधात जिहाद पुकारण्यासाठी प्रशिक्षण दिलं होतं, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. वाचा सविस्तर : 

३.Ind vs SA : विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार?? सामनाधिकाऱ्यांनी सुनावली शिक्षा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ९ गडी राखत आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी एक चिंताजनक बातमी आहे. फलंदाजीदरम्यान नियमाचा भंग केल्याप्रकरणी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी विराटला शिस्तभंगाचा एक गुण (Demerit Point) दिला आहे. विराटकडून आयसीसीच्या Level 1 मधील 2.12 नियमाचा भंग झाला आहे. वाचा सविस्तर : 

४.नरेंद्र मोदींचं विधान अत्यंत आक्रमक होतं : डोनाल्ड ट्रम्प
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सोमवारी(दि.23) न्यू-यॉर्क येथे भेट झाली. या भेटीपूर्वी ट्रम्प आणि इम्रान खान यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वाचा सविस्तर :

५.‘…तर माझ्यावर खुशाल बहिष्कार टाका’, भडकला सलमान
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १३’ चा नुकताच लॉन्चिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खान छायाचित्रकारांवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. छायाचित्रकार सतत सलमानचे फोटो काढत असल्यामुळे त्याच्या कामामध्ये व्यत्यय येत होता याच कारणासाठी सलमान भडकल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर :