१. अमेरिकेतून परतल्या प्रियंका, राहुल गांधींबरोबर गुरूवारी होणार पहिली बैठक
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी आणि पक्षाच्या सरचिटणीस व पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या आपल्या विदेश दौऱ्यावरुन परतल्या आहेत. अमेरिकेहून परतल्यावर प्रियंका या राहुल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली. वाचा सविस्तर :

२. सायना,सिंधू,श्रीकांत दावेदार
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात मी घडवलेल्या तीन आघाडीच्या बॅडमिंटनपटूंपैकी किमान एक जण तरी यशस्वी ठरेल, असा विश्वास भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी व्यक्त केला. १८ वर्षांपूर्वी ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद गोपीचंद यांनी मिळवल्यानंतर एकाही भारतीय खेळाडूला त्या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवता आलेले नाही. वाचा सविस्तर :

३.पराभव दिसत असल्यानेच मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढळले!
आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन ढासळत चालले असून, विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर नेल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृतांचा आहे हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे याकडे अशोकरावांनी लक्ष वेधले आहे. वाचा सविस्तर :

 

४.कामकाजासाठी ‘झिरो नंबर’
राज्य उत्पादक शु्ल्क विभागात गेल्या १६ वर्षांपासून नवीन पदांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीनही कार्यालयातील बहुतेक कामकाज खाजगी व्यक्ती अर्थात ‘झिरो नंबर’च्या व्यक्तींकडून चालवले जात आहे. त्यांच्याकडून आर्थिक कामे करवून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा सविस्तर :

५.माझ्या हिंमतीला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, गडकरींचा राहुल गांधींवर पलटवार
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा शस्त्रासारखा वापर करत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या उपरोधिक ट्विटवर गडकरींनी पलटवार केला आहे. वाचा सविस्तर :

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या उपरोधिक ट्विटवर गडकरींनी पलटवार केला आहे.