29 May 2020

News Flash

२८ वर्षांनंतर अमेरिका करतंय अण्विक चाचणीचा विचार, पण का?

१५ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

अमेरिकेला चीन आणि रशियापासून धोका असल्याचं सांगत अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन तब्बल २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अण्विक चाचणी करण्याच्या विचारात आहे. १९९२ मध्ये अमेरिकेनं अखेरची अण्विक चाचणी केली होती. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील संरक्षण संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा केली. आपल्या शस्त्रास्त्रांची तपासणी करणं आणि नवीन डिझाइन केलेले शस्त्रांचं उत्पादन करणं हा या चाचणीमागील महत्त्वाचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे.

रशिया आणि चीन हे दोन्ही देश आपापल्या देशात अण्विक चाचण्या करत असतात. परंतु आतापर्यंत त्या देशांनी ही बाब नाकारली आहे, असं असं संरक्षण क्षेत्राशी निगडीत एका अधिकाऱ्यानं सांगितलं. डेली मेलनं वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. दरम्यान, १५ मे रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. त्यावेळी अमेरिकेच्या अण्वस्त्रांची ‘वेगवान चाचणी’ केल्यास अमेरिकेला रशिया आणि चीन या दोन्ही देशांशी वाटाघाटी करण्यास मदत होईल, असा प्रस्तावही देण्यात आल्याचं वॉशिंग्टन पोस्टनं नमूद केलं आहे.

अमेरिकेच्या या अण्विक चाचणीचा मुख्य उद्देश म्हणजे त्याच्या अणुबॉम्बच्या सद्या असलेल्या साठ्याची विश्वासार्हता तपासणं आणि नवीन प्रकारच्या आण्विक शस्त्रास्त्रांची निर्मिती करणं हा आहे. सध्या कोणतीही नवी अण्विक शस्त्रास्त्र तयार करण्यात येणार नाही, असं ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. परंतु चर्चेसाठी रशिया आणि चीननं नकार दिला तर शस्त्रास्त्र तयार करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवला आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान या पार पडलेल्या बैठकीत अण्विक चाचणीबाबत सदस्यांमध्ये मतभेदही दिसून आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

अमेरिकेकडे ३८०० अण्विक शस्रास्त्र

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत अण्विक चाचणीवर कोणाचंही एकमत झालं नाही. परंतु यावर चर्चा सुरू आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. तसंच काही जणांनी या चाचणीवर चिंताही व्यक्त केली आहे. अमेरिकेनं केलेली अण्विक चाचणी अण्विक शस्रास्र असलेल्या राष्ट्रांनाही चाचण्या करण्यासाठी प्रवृत्त करेल. तसंच यामुळे अन्यदेशांमध्ये चढाओढही सुरू होईल, अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली. अमेरिकेकडे सध्या ३ हजार ८०० अण्विक शस्त्रास्त्र आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 11:17 am

Web Title: trump administration considering first nuclear weapons test since 1992 citing threats from russia and china jud 87
Next Stories
1 Lockdown: आई, वडील, पत्नी सर्वांचा मृत्यू; ३० वर्षांनंतर घरी परतल्यानंतर बसला धक्का
2 भारताच्या ‘त्या’ चार भागांवर ड्रॅगनची नजर, तिथेच घडल्या घुसखोरीच्या ८० टक्के घटना
3 भारताच्या ‘मँगो मॅन’चा करोना योद्ध्यांना अनोखा सलाम; विकसित केला ‘पोलीस आंबा’ आणि ‘डॉक्टर आंबा’
Just Now!
X