देशातील आठ शिक्षण संस्थांमध्ये खुल्या वर्गातील आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, अशा आशयाचे एक निवेदन विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) यासंबंधी प्रसिद्ध केले आहे. देशाच्या कोणकोणत्या शिक्षण संस्थांमध्ये केंद्र सरकारने आणलेले १० टक्के आरक्षण लागू होईल किंवा नाही, हे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

युजीसीचे संयुक्त सचिव डॉ. जितेंद्रकुमार त्रिपाठी यांच्याकडून देण्यात आलेल्या सुचनेनुसार, देशातील ४० सरकारी विद्यापीठे, ८ डीम्ड विद्यापीठे, दिल्लीमधील ५४ महाविद्यालये, बनारस हिंदू विद्यापीठाशी संलग्न चार महाविद्यालये आणि इलाहाबाद विद्यापीठातील ११ संलग्न महाविद्यालये, उत्तराखंडमधील हेमवती नंदन बहुगुणा गढवाल केंद्रीय विद्यापीठामध्ये आणि गुरुकुल कांगडी विद्यापीठ, हरिद्वारमध्ये १० टक्के आरक्षणाचा लाभ मिळेल.

युजीसीकडून आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना ३१ मार्चपूर्वीच वाढलेल्या जागांसह संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व संस्थांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे. युजीसीने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये कोर्सप्रमाणे जागांची माहिती आणि उत्पन्नांच्या साधनांची माहिती ३१ जानेवारी २०१९ पूर्वी उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे.

या शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळणार नाही….

होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर ट्रांबे, इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च कलपक्कम, राजा रमन्ना सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी इंदूर, इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च गांधीनगर, व्हेरिएबल एनर्जी साइक्लोट्रोन सेंटर कोलकाता, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स कोलकाता, इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स भुवनेश्वर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स चेन्नई, हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट इलाहाबाद, टाटा मेमोरियल सेंटर मुंबई, टाटा इन्स्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई, नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिकल सायन्स, शिलाँग. इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलंस या शैक्षणिक संस्थांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही.

या शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळणार नाही….

नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मानेसर, गुड़गांव, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायन्टिफिक रिसर्च, बंगळूरु, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद, स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी, तिरुवनंतपुरम, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ रिमोट सेंसिंग, डेहराडून.