25 May 2020

News Flash

युक्रेनप्रकरणी पुतिन यांच्याशी मून यांची चर्चा

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी शनिवारी युक्रेन प्रश्नावर चर्चा केली.

| March 16, 2014 05:21 am

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी शनिवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी शनिवारी युक्रेन प्रश्नावर चर्चा केली. युक्रेनमधील पेचप्रसंगावर अद्यापही तोडगा शक्य आहे, याची आशा आपल्याला वाटत असल्याचे नमूद करतानाच क्रिमियावर नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या तंटय़ाचे रूपांतर मोठय़ा संकटात होऊ शकते, असा इशाराही मून यांनी दिला आहे. रशियात सामील होण्यासंबंधी क्रिमिया प्रांतात रविवारी सार्वमत घेण्यात येणार असून त्यामध्ये संबंधित मतदार रशियाच्या बाजूने आपला कौल देण्याची शक्यता मून यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मॉस्कोमधील सुमारे ५० हजार आंदोलकांनी शनिवारी येथे अनेक मेळावे घेऊन रशियाच्या या कृतीबद्दल आपला निषेध नोंदविला.
रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी तातडीने आपले सैन्य मागे घेऊन शीतयुद्धसदृश संघर्षांस समाप्त करावे, अशी मागणी या आंदोलकांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2014 5:21 am

Web Title: ukraine crisis triggers anti putin protests in moscow
Next Stories
1 ओसामाला शोधण्यात मदत करणाऱ्या डॉक्टरच्या शिक्षेत कपात
2 युक्रेनमध्ये हिंसाचारात आंदोलक ठार
3 बेपत्ता विमानाच्या शोधात अपयशच ; वैमानिकही संशयाच्या भोवऱ्यात
Just Now!
X