करोना मृत्यूंची घोषणा करताना आरोग्य अधिकाऱ्याने जोकराचा वेश घेतला होता. याबद्दलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेतेल्या ओरेगनमध्ये ही घटना घडली आहे. क्लेअर पोचे असं या महिला आरोग्य अधिकाऱ्याचं नाव आहे. क्लेअर या ओरेगनमध्ये आरोग्य अधिकारी आहेत. त्यांनी पोलका डॉटचा शर्ट, लाल रंगाचा टाय आणि जोकराप्रमाणे मेक अपकेला होता. त्यांच्या या मेकअपची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.

सध्याच्या घडीला ओरेगनमध्ये ३८ हजार १६० केसेस आहेत. ३९० केसेस नव्याने आढळल्या आहेत असं सांगत असतानाच ६०८ मृत्यू आत्तापर्यंत झाले आहेत असं आरोग्य अधिकारी क्लेअर पोचे यांनी सांगितलं. मात्र ही सगळी घोषणा करत असताना त्यांनी जोकराचा ड्रेस परिधान केला होता.

ओरेगनमध्ये आत्तापर्यंत ६०८ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे असं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. दुसऱ्या एक वरिष्ठ अधिकारी शिमी शेरीफ यांनी एका प्राण्याचा वेश परिधान केला होता. माझा हा वेश एका जापनिज कार्टूनवरुन घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं. या दोन अधिकाऱ्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा होते आहे. हा व्हिडीओ १४ ऑक्टोबरचा आहे.