भारत सरकारने बंदी घातलेल्या वेबसाइटला भेट दिल्यास अथवा अशा साइटवरुन फाइल डाउनलोड केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. मागील पाच वर्षात सरकारने अनेक इंटरनेट वेबसाइटवर बंदी घातली आहे. मात्र ब्लॉक करण्यात आलेल्या यूआरएलवर आज देखील अनेक नेटीझम्स भेट देत असतात. मात्र, अशा वेबसाइटवर व्हिडिओ पाहणे अथवा फाइल डाउनलोड केल्यास तीन वर्षाचा कारावास किंवा ३ लाखांचा दंड भरावा लागू शकतो. इंडिया टुडेने सादर केलेल्या अहवालानुसार, टोरेंट फाइल पाहणे किंवा डाउनलोड केल्यासच नव्हे तर सरकारकडून बंदी घालण्यात आलेल्या वेबसाइटला भेट देणे देखील गुन्हा आहे. त्यामुळे सरकार आणि न्यायालयाच्या आदेशाने ब्लॉक करण्यात आलेल्या वेबसाइटला भेट देणे कायदेशीर गुन्हा ठरते. भारतामध्ये यूआरएल आणि  वेबसाइट्स डीएनएस- फिल्टरिंग (DNS-filtering) द्वारे ब्लाक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या यादीमध्ये ब्लॉक साइटचा डीएनएस जतन करुन ठेवला जातो. या साइटला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केल्यास इंटरनेट सेवा पुरविणारा डीएनएस सर्वरद्वारे ब्लॉक करण्यात येतो.