16 November 2019

News Flash

बंदुकीचा धाक दाखवत दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत

संग्रहित छायाचित्र

उत्तर प्रदेशात दोन सख्ख्या बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी बंदुकीचा धाक दाखवत दोन्ही बहिणींवर सामूहिक बलात्कार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकऱणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत आहेत.

तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीडित मुली १३ आणि १५ वर्षांच्या आहेत. कासेरवा गावात चौघांकडून हा बलात्कार करण्यात आला. पीडित मुली ऊसाच्या शेतात आपल्या आईचा शोध घेण्यासाठी गेल्या असता आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत दोन्ही बहिणींवर बलात्कार केला अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक आलोक शर्मा यांनी दिली आहे.

जर घटनेची कोणाला माहिती दिली किंवा मदतीसाठी रडलात तर तुम्हाल गोळ्या घालून ठार करु अशी धमकी आरोपींनी पीडित मुलींना दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे अशी माहिती आलोक शर्मा यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी पोलिसांना काही महत्त्वाचे आदेश दिले असून ग्रामीण भागांमध्ये पायी चालत गस्त घालण्यास सांगितलं आहे.

First Published on June 13, 2019 2:34 pm

Web Title: uttar pradesh sisters gangraped on gun point sgy 87