08 August 2020

News Flash

वरूण गांधी यांना कन्यारत्न

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सुलतानपूरमधील खासदार वरूण गांधी आणि त्यांची पत्नी यामिनी यांना सोमवारी कन्यारत्न झाले.

| August 18, 2014 06:15 am

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सुलतानपूरमधील खासदार वरूण गांधी आणि त्यांची पत्नी यामिनी यांना सोमवारी कन्यारत्न झाले. स्वतः वरूण गांधी यांनीच आपल्या घरातील या नव्या पाहुण्याची माहिती पत्रकारांना दिली.
आम्हाला सोमवारी दुपारी नवी दिल्लीत कन्यारत्न झाल्याचे वरूण गांधी यांनी सांगितले. कन्या झाल्यामुळे कुटुंबातील सर्वांनाच अत्यानंद झाला आहे. आम्ही आमच्या कन्येचे नाव अनसुया ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. वरूण गांधी हे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे पुत्र आहेत. मार्च २०११ मध्ये त्यांचा वाराणसीतील कामकोटेश्वर मंदिरात यामिनी यांच्याशी विवाह झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2014 6:15 am

Web Title: varun gandhi becomes father of baby girl
टॅग Varun Gandhi
Next Stories
1 मोसुल धरण इराकी फौजांच्या ताब्यात
2 उत्तरेत पुराचे भय; नद्यांचा रु द्रावतार
3 भाजप सत्तेत येताच सांप्रदायिक हिंसेत वाढ
Just Now!
X