News Flash

मल्ल्याची संपत्ती विकून बँका करणार वसुली; PMLA कोर्टानं दिली मंजुरी

मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागता येणार आहे.

बँकांना कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या संपत्तीवर आता गडांतर येणार आहे. माल्ल्याची संपत्ती विकून बँका आता वसुली करू शकणार आहेत. पीएमएलएच्या विशेष न्यायालयानं भारतीय स्टेट बँक आणि अन्य बँकांना माल्ल्याची संपत्ती विकून कर्ज वसूल करण्याची परवानगी दिली आहे. तसंच सक्तवसूली संचलनालयानंही यावर हरकत नसल्याचं म्हटलं आहे.

तारीख केवळ रिकव्हरी ट्रिब्यूनलच ठरवू शकतो यावर माल्ल्याच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, पीएमएलए न्यायालयानं या निर्णयावर १८ तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसंच मल्ल्याला आता मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागता येणार आहे. बँकांना ९ हजार कोटी रूपयांचा चुना लावणाऱ्या मल्ल्यावर ब्रिटनमधील न्यायालयातही खटला सुरू आहे.

विजय मल्ल्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यातील निर्णय लंडन न्यायालयानं सुरक्षित ठेवला आहे. जानेवारी महिन्यात यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. तर विजय मल्ल्याची दिवाळखोरी घोषित करण्याची याचिकाही फेटाळजी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोट्यवधींचा चुना लावून डिसेंबर २०१६ मध्ये माल्ल्यानं लंडनमध्ये पळ ठोकला होता. सरकार आणि तपास यंत्रणा मल्ल्याला आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 12:51 pm

Web Title: vijay mallya property sale permission given by pmmla court jud 87
Next Stories
1 २०२० मध्ये इस्रोची ‘गगन’भरारी, चांद्रयान-३ साठी केंद्र सरकारची परवानगी
2 अभिनेत्रीने पतीसमोरच केली एक्स बॉयफ्रेंडची हत्या
3 देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करणार नाही : नरवणे
Just Now!
X