30 November 2020

News Flash

WHO ने करोनावर देण्यात येणारं रेमेडिसविर औषध यादीतून केलं बाद

रेमेडिसिविर औषधाबाबत WHO चा मोठा निर्णय

WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने करोनावर देण्यात येणारं रेमेडिसिविर हे औषध यादीतून बाद केलं आहे.करोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध सर्रास देण्यात येत होतं. मात्र आता हे औषधांच्या यादीतून WHO ने बाद ठरवलं आहे. हे औषध करोना बरं होण्यासाठी गुणकारी ठरतं यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही असंही WHO ने म्हटलं आहे.

ज्या देशांमधील रुग्णालयांमध्ये रेमेडिसविर या औषधाचा वापर केला जातो त्यांनी तो बंद करावा असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला हा सल्ला अनेकांना चुकीचा वाटू शकतो कारण अनेक देशांमध्ये वैज्ञानिकांनी करोनावर रेमेडिसविर हे औषध लागू पडतं आहे असं म्हटलं आहे. मात्र WHO ने औषध यादीतून बाद केलं आहे. रॉयटर्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, WHO चे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी एका इमेलला पाठवलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, “होय आम्ही रेमेडिसविर हे औषध PQ प्रीक्वालिफिकेशन लिस्टमधून बाद केलं आहे. करोनावर उपचार करण्यासाठी एकाही देशाने हे औषध खरेदी करु नये.” असंही त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे भारतात करोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वाढ झालेली पाहण्यास मिळाली आहे. तसंच आशियाई देशांमध्ये करोनाची दुसरी लाट येऊ शकते तेव्हा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आशियाई देशांनी तयार रहावं असंही WHO ने म्हटलं आहे. दरम्यान याच जागतिक आरोग्य संघटनेने रेमेडिसिविर हे औषध करोनावर वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या यादीतून बाद केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 9:51 pm

Web Title: who suspends remdesivir from list of medicines after warning against use on covid19 patients
टॅग Coronavirus
Next Stories
1 IAS अधिकारी टिना डाबी आणि अथर खान विभक्त होणार, घटस्फोटासाठी अर्ज दाखल
2 २६/११ सारख्या हल्ल्याच्या उद्देशाने आले होते चार दहशतवादी, मोदींनी घेतलं पाकिस्तानचं नाव
3 उत्तर प्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ विरोधात योगी सरकारचा कडक कायदा येणार
Just Now!
X