News Flash

मोदींनी नेमका त्याच दिवशी मास्क का नव्हता घातला? – नवाब मलिकांचा खोचक प्रश्न

“याचा अर्थ हा कार्यक्रम ठरवून झालेला होता...” असा आरोप करत, “पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून?” असाही प्रश्न केला आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला रुग्णसंख्येसोबतच मृत्यू संख्येनेही उच्चांक गाठले आहेत. सध्या देशात रुग्णसंख्या जरी कमी होताना दिसत असली, तरी रोज चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत असून उपाययोजनांची माहिती घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचं पहायला मिळालं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Video: संसदेचा सेंट्रल हॉल ते अमेरिका… सात वर्षांमध्ये मोदी कधी आणि कुठे कुठे भावूक झाले?

“मुख्यमंत्र्यांसोबत स्वतःच्या केबिनमध्ये बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान मोदी नेहमी परचा आणि मास्क वापरत होते, मात्र त्याचदिवशी गमछा आणि मास्क दोन्ही गायब होते, याचा अर्थ हा ठरवून झालेला कार्यक्रम होता.”, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

VIDEO: “करोनाने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं,” कार्यक्रमात बोलताना मोदींना भावना अनावर

तसेच, “याच कार्यक्रमात मोदींनी मास्क का घातला नाही व गमछा का घालून आले नाहीत? ते खरंच भावूक झाले की ठरवून झाले?यावर जनता प्रश्न करत आहे”, असेही नवाब मलिक म्हणाले.

“मोदी राजकारणात नसते तर चित्रपटांमध्ये असते, ते तिथे न गेल्याने चित्रपटांचा फायदा झाला पण…”

दरम्यान “पंतप्रधान नरेंद्र मोदी खरंच भावूक झाले की मग ठरवून झाले याचं उत्तर आणि खरं काय आहे हे मोदीच सांगू शकतील?” असंही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

Video: “काही दिवसांत मोदी TV वर येऊन रडतील”; खासदाराने १७ एप्रिलला केलेली भविष्यवाणी खरी ठरली

“देशात लाखोंच्या संख्येने लोकांनी जीव गमावला. औषधोपचार मिळत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले. केंद्र सरकार व बहुतांश राज्य सरकारांच्या हलगर्जीपणामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश निर्माण झाला आहे, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले हे जे चित्र निर्माण करण्यात आले. ते भावूक झाले याबाबत लोकं प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.” असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 4:44 pm

Web Title: why did not modi wear a mask on that same day nawab maliks question msr 87
Next Stories
1 Exam from Home : ‘ओपन बुक पद्धती’ने बारावीची परीक्षा; छत्तीसगड सरकारचा निर्णय
2 ओडिशातील ‘या’ गावात करोनाचा एकही रुग्ण नाही
3 करोना योद्ध्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांनी वाटली चिप्सची पाकिटं
Just Now!
X