25 May 2020

News Flash

महाराष्ट्रातून हलवलेले सामने जयपूरमध्ये का? हायकोर्टाचा बीसीसीआयला सवाल

राजस्थानमधील पाण्याची स्थिती अधिक गंभीर

संग्रहित छायाचित्र

राजस्थानमधील पाण्याची स्थिती देशातील इतर अनेक राज्यांपेक्षा भीषण असताना महाराष्ट्रातील दुष्काळामुळे तेथून बाहेर हलविण्यात आलेले आयपीएलचे सामने जयपूरमध्ये का, असा प्रश्न गुरुवारी राजस्थान उच्च न्यायालयाने उपस्थित केला. त्याचबरोबर याबद्दल आपली बाजू मांडण्याचे आदेश राजस्थान सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिले आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे मुंबई आणि पुण्यातून बाहेर हलविण्यात आलेले काही सामने जयपूरमध्ये खेळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर जयपूरमधील मुक्त पत्रकार महेश परीक यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, याचिकेवर निर्णय येत नाही, तोपर्यंत हे सामने खेळवण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.
याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालय म्हणाले की, देशातील इतर अनेक राज्यांच्या तुलनेत राजस्थानमधील पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती अधिक भीषण आहे. मग महाराष्ट्रातून दुष्काळामुळे बाहेर हलविण्यात येणारे सामने जयपूरमध्ये का घेण्यात येत आहेत, याबद्दल राजस्थान सरकार आणि बीसीसीआयने बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. येत्या बुधवारपर्यंत बाजूं मांडण्यात यावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. त्याच दिवशी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2016 2:09 pm

Web Title: why hold ipl 2016 matches in rajasthan high court asks government bcci
टॅग Bcci,Ipl
Next Stories
1 Rahul Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समितचे स्थानिक स्पर्धेत दमदार शतक
2 मुंबई पुन्हा विजयपथावर
3 ऑलिम्पिक पात्रता फेरीपासून राहुल आवारे पुन्हा वंचितच
Just Now!
X