26 February 2021

News Flash

Coronavirus: तुमच्याच नाही अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष – पंतप्रधान मोदी

अर्थव्यवस्थेवरुन टीका करणाऱ्यांना मोदींचं उत्तर

करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नेमका किती आणि काय परिणाम झालाय, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

सध्या देश करोना नावाच्या व्हायरससोबत लढतो आहे. मात्र भारत हा देश प्रत्येक संकटातून बाहेर पडला आहे. आपला इतिहास हेच सांगतो आहे. एकीकडे देश करोना नावाच्या जागतिक संकटाचा सामना करतो आहे. तर दुसरीकडे सरकार म्हणून आमचं लोकांच्या आरोग्यसोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

आपला देश जेव्हा एखाद्या संकटातून उभारी घेण्याची गोष्ट करतो आहे त्याचा अर्थ ही उभारी देशाच्या आरोग्याला आणि त्यासोबत अर्थव्यवस्थेलाही मिळणार आहे. अशक्यही शक्य करुन दाखवायचं ही भारतीयांची प्रेरणा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचा ग्रीन सिग्नल भारतीयांकडून मिळू लागला आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी देशाशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या घडीला सगळं जग करोनावर लस शोधतं आहे. अशात भारत ही लस शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्याच्या घडीला आपल्या कंपन्याही जगभरात लस शोधण्यासाठी मदत करत आहेत. इंडिया ग्लोबल वीक २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोल होते. ज्या देशांमध्ये खुली अर्थव्यवस्था आहे, अशा देशांपैकी भारत एक आहे. आम्ही जगभरातल्या गुंतवणूकदारांचं भारतात स्वागत करतो. देशातील फार्मा उद्योग हा फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी महत्त्वाचा ठरतो आहे. आत्मनिर्भर भारत या शब्दावरही मोदींनी पुन्हा एकता जोर दिला आहे. आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ आत्मकेंद्री होणं असा नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 2:31 pm

Web Title: with an increased focus on peoples health we are equally focussed on health of economy says pm modi scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘कोविड स्पेशल ट्रेन’मधून ४० लाख रुपयांच्या सिगारेट जप्त, कस्टम विभागाची कारवाई
2 गलवान खोरं, हॉट स्प्रिंग, गोग्रामधून ड्रॅगन मागे हटला पण….
3 संक्रमणाचा धोका वाढला; एका रुग्णांपासून १.१९ लोकांना करोनाचा संसर्ग
Just Now!
X