23 October 2020

News Flash

ट्रम्प यांना विष भरलेले पत्र पाठवणाऱ्या महिलेस अटक

महिलेने रिसिन हे विष भरलेले पाकीट ट्रम्प यांना व्हाइट हाऊसच्या पत्त्यावर पाठवले होते.

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विष भरलेले पाकीट पाठवणाऱ्या महिलेस न्यूयॉर्क-कॅनडा सीमेवर अटक करण्यात आली आहे. कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या महिलेने रिसिन हे विष भरलेले पाकीट ट्रम्प यांना व्हाइट हाऊसच्या पत्त्यावर पाठवले होते. हे पाकीट व्हाइट हाऊस अधिकाऱ्यांच्या हाती पडण्याआधीच त्यात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. हे पत्र पाठवणाऱ्या महिलेस अमेरिका सीमा संरक्षण अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून तिला बफेलो येथे पीस ब्रिज सीमा ओलांडताना ताब्यात घेतले आहे. आता तिला संघराज्य आरोपांना सामोरे जावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:37 am

Web Title: woman arrested for sending poisonous letter to trump abn 97
Next Stories
1 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १ लाख पदे रिक्त
2 अयोध्येतील मशीद काबासारखी चौरसाकृती
3 भारत-चीन चर्चेची सहावी फेरी
Just Now!
X