News Flash

रेल्वे अॅपवरुन आता विमान तिकिटही बुक करता येणार

रेल्वेच्या विविध सेवा आता एकाच अॅपवर

प्रातिनिधीक छायाचित्र

आता रेल्वेच्या अॅपवरुन विमानाचे तिकिट बुक करता येणार आहे. या आठवड्यात रेल्वेकडून नवे अॅप लॉन्च करण्यात येणार असून या अॅपमुळे विविध सोयी सुविधांचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. हमालाची सेवा घेणे, विश्रांतीगृह बुक करणे, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे या सर्व गोष्टी एकाच अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना यापुढे करता येणार आहेत.

रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी देणाऱ्या अॅपची निर्मिती रेल्वेच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारी असलेल्या ‘क्रिस’कडून करण्यात आली आहे. यासाठी सात कोटींचा खर्च आला असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. ‘सध्या रेल्वेच्या विविध सेवांसाठी वेगवेगळे अॅप आहेत. विविध अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या विशिष्ट सेवा दिल्या जातात. मात्र बहुतांश अॅपमधून एकच सेवा देण्यात येते. रेल्वेकडून देण्यात येणाऱ्या सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी रेल्वेकडून नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘मोबाईल वापरकर्त्यांना रेल्वेच्या प्रत्येक सेवेसाठी अॅप शोधून ते डाऊनलोड करावे लागतात. या सगळ्या अॅपला पर्याय देण्यासाठी आणि प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी पुरवण्यासाठी नव्या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा एकाच अॅपवर मिळणे गरजेचे होते. नव्या अॅपच्या माध्यमातून रेल्वेच्या सर्व सुविधांसोबतच टॅक्सी बुकिंग, हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटदेखील बुकिंगदेखील करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेल्वेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात अॅपच्या निर्मितीबद्दल घोषणा करण्यात आली होती. ‘सध्या रेल्वेचे तिकिट बुकिंग, तक्रार निवारण यांच्यासह विविध सेवांसाठी विविध अॅप उपलब्ध आहेत. अनेक अॅप्सचा गोंधळ संपुष्टात आणण्यासाठी तिकिट बुकिंग आणि रेल्वेबद्दलच्या तक्रारी यांच्यासाठी दोन अॅप आवश्यक आहेत,’ असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलताना म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 8:39 am

Web Title: you could book flight tickets from railway app soon
Next Stories
1 जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची कारवाई
2 ट्रम्पपुत्राकडून वादग्रस्त ई-मेल जाहीर
3 अमरनाथ यात्रेकरूंना वाचवणाऱ्या बसचालकास ३ लाखांचे बक्षीस
Just Now!
X