News Flash

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर निदर्शने

आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

देशात सध्या पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये दर पेट्रोलच्या दराने शंभरीच गाठली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरत आहेत. अनेक ठिकाणी केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन देखील केली जात आहे. आज(मंगळवार) राजधानी दिल्लीत देखील युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. ही निदर्शने गॅस दरवाढीच्या विरोधात देखील होती. दरम्यान, आक्रमक झालेल्या काही निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील समोर आले आहे.

या अगोदर युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आंदोलन केलं होतं.

घरगुती गॅसच्या दर वाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

दरम्यान, काल(सोमवाीर) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाली. यामुळे अगोदर पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे त्रस्त असलेल्या सामान्यांना मोठा झटका बसला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
“एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा- चूल फुका- खोटी आश्वासनं ऐकून पोट भरा!” असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 3:18 pm

Web Title: youth congress protests outside petroleum ministry to protest petrol diesel gas price hike msr 87
Next Stories
1 “सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली, पण ‘नवरा’ कोण आहे?”
2 Video: प्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन केली चहाच्या पानांची तोडणी
3 आता संसद टीव्ही! लोकसभा-राज्यसभा टीव्ही चॅनेलचं सरकारकडून विलीनीकरण
Just Now!
X