16 July 2020

News Flash

मुली पटविण्यासाठी तरूण दहशतवादी होतात,आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्याची कबुली

हिज्बुल मुजाहिद्दीन मध्ये तरूण दाखल झाला तर मुलींना तो रॉबिन हुड वाटतो-दानिश अहमद

मुली पटविण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी तरूण दहशतवादी होतात, अशी कबुली हिज्बुलचा दहशतवाद्याने दिली आहे. इतकेच नाही तर मुली दहशतवाद्यांना आपला हिरो मानतात असेही या दहशतवाद्याने म्हटले आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी दानिश अहमदने हे वक्तव्य केले आहे. ७ एप्रिलला त्याने भारतीय सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान त्याने ही धक्कादायक कबुली दिली आहे. हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत असे अनेक तरूण आहेत ज्यांना आत्मसमर्पण करायचे आहे , मात्र जे आत्मसमर्पण करतात त्यांची हत्या केली जाते म्हणून हे तरूण घाबरतात असेही दानिशने म्हटले आहे. दानिशवर उत्तर काश्मीरच्या तरूणांना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी करून घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दक्षिण काश्मीरपणे उत्तर काश्मीरमध्येही दहशतवाद पसरवता यावा म्हणून जास्तीत जास्त तरूण हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार येतो आहे असेही दानिशने म्हटले आहे.

स्थानिक तरूण या संघटनेत सहभागी होतात कारण त्यांना मुलींना आकर्षित करण्याची इच्छा असते. इथल्या मुलीही दहशतवाद्यांना आपला हिरो मानतात. त्यामुळे हिज्बुल किंवा तशा संघटनांशी जोडले जाणे इथल्या तरूणांना भूषणावह वाटते असेही दानिशने स्पष्ट केले आहे. हिज्बुल किंवा त्यासारख्या दहशतवादी संघटनांमध्ये तरूण गेला की मुली त्याला रॉबिन हुड समजतात. हिज्बुलमध्ये असे अनेक कमांडर आहेत ज्यांच्या अनेक प्रतिमा रूढ झाल्या आहेत. काहींना ते हिरो वाटतात काही जणांना त्याची विचारसरणी चुकीची वाटते.

अबू दुजाना हा पाकिस्तानी अतिरेकी हिज्बुलमधला एक कमांडर आहे. त्याला लवकरच लष्कर-ए-तोयबा या संघटनेचा म्होरक्या करण्यात येणार आहे असेही दानिशने आपल्या कबुलीत म्हटले आहे. सबजार भट्ट या दहशतवाद्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्यात दानिश सहभागी होता. सबजारला २७ मे रोजी झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले होते. बुऱ्हान वाणीनंतर सबजारला हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर करण्यात आले होते. सबजारला सबडॉन या नावानेही ओळखले जाई. बुऱ्हान वाणीचा तो खास हस्तक होता अशीही माहिती दानिशने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2017 2:03 pm

Web Title: youth joins terrorism to attract girls says danish ahmad
Next Stories
1 ‘जेईई अॅडव्हान्स’चे निकाल जाहीर, सर्वेश मेहतानी देशात पहिला
2 केरळमध्ये जहाजाची बोटीला धडक, दोघांचा मृत्यू
3 घुसखोरीचा डाव उधळला, ९६ तासांत १३ घुसखोरांचा खात्मा
Just Now!
X