News Flash

स्मार्टफोन नाकारला म्हणून मित्राची हत्या करुन जाळला मृतदेह

स्मार्टफोन द्यायला नकार दिला म्हणून १९ वर्षाच्या युवकाने आपल्याच मित्राची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

स्मार्टफोन द्यायला नकार दिला म्हणून १९ वर्षाच्या युवकाने आपल्याच मित्राची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळला. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत युवक १७ वर्षांचा होता. दोघेही शेजारी रहायचे अशी माहिती पोलिसांनी दिली. जी. प्रेम सागर असे आरोपीचे नाव आहे.

घटनेच्या दिवशी प्रेम सागर आणि डी. प्रेम उप्पल येथे भेटले. त्यानंतर प्रेम सागर डी. प्रेमला आपल्या बाईकवर बसवून आदीबाटला येथील निर्जन स्थळी घेऊन गेला व तिथे त्याची हत्या केली अशी माहिती मलकाजगिरीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली. महत्वाच्या विषयावर बोलायचे आहे असे सांगून प्रेम सागर डी. प्रेमला लाँग ड्राईव्हला घेऊन गेला.

त्याने बाईक निर्जन स्थळी उभी केली. त्यानंतर प्रेम सागरने काठीने डी. प्रेमच्या डोक्यात प्रहार केले. डी. प्रेम बेशुद्ध होऊन खाली पडल्यानंतर प्रेम सागरने त्याच्या अंगावर पेट्रोल ओतले व त्याला पेटवून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी १४ जुलैला डी. प्रेम बेपत्ता असल्याशी तक्रार दाखल करुन घेतली.

पोलिसांनी प्रेम सागरला ताब्यात घेऊन आपल्या पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने स्मार्टफोनसाठी हत्या केल्याची कबुली दिली. हैदराबाद पोलिसांनी हत्येचे कलम ३०२, ३६४ आणि २०१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2018 1:04 pm

Web Title: youth murder friend for refusing smartphone
टॅग : Smartphone
Next Stories
1 गाय तुमची आई असेल आमची नाही, बसपा नेत्याचा भाजपाला टोला
2 अल्पवयीन मुलीचे ७ महिने लैंगिक शोषण, १८ जणांना अटक
3 जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कायदा करा: सुप्रीम कोर्ट
Just Now!
X