१०० मानवी सांगाडे सापडले;

येथील पोलिसांच्या वसाहतीमधील एका खोलीतून १०० मानवी सांगाडे सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

येथील पोलिसांच्या वसाहतीमधील एका खोलीतून १०० मानवी सांगाडे सापडल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लखनऊ येथून घटनास्थळी न्यायवैद्यक तज्ज्ञांचे एक पथकही पाठविण्यात आले आहे.
गंगा नदीतून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आल्यानंतर काही दिवसांतच हे मानवी सांगाडे मिळाल्याने पोलीस चक्रावले आहेत. जिल्हा प्रशासनाचा एक अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी अशा दोन जणांची एक समिती स्थापन करण्यात आल्याचे उन्नावच्या जिल्हा दंडाधिकारी सौम्या अग्रवाल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लखनऊ येथून न्यायवैद्य्रक तज्ज्ञांचे एक पथकही पाठविण्यात आले आहे.
उन्नावच्या पोलीस अधीक्षकांकडूनही अहवाल मागविण्यात आला असून, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण अधिक सुस्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 100 skeletons found dumped in unnao

ताज्या बातम्या