प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या संचलनाच्या आधी सराव म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘बिटिंग रिट्रिट’च्या कार्यक्रमात यंदा ड्रोन्सची कमाल पहायला मिळाली. नवी दिल्लीमध्ये एकाच वेळी एक हजार ड्रोन्सच्या प्रकाशाने आकाशामध्ये अद्भूत दृष्य पहायला मिळालं.

सालाबादप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांआधीपासून दिल्लीमधील प्रमुख सरकारी इमारती ज्यामध्ये संसद भवन, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान निवसस्थान, इंडिया गेट यासारख्या ठिकाणांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईबरोबरच यंदा या सरावामध्ये हवेतील रोषणाईचा नजारा पहाला मिळाला. एकाच वेळी एक हजार ड्रोन्स राजपथावरुन उडताना दिसले. रात्रीच्या आकाशामध्ये हिरव्या, पांढऱ्या, भगव्या आणि निळ्या रंगामध्ये चमकणारे हे ड्रोन्स एखाद्या पक्षांच्या थव्याप्रमाणे लयबद्ध पद्धतीने हवेमध्ये संचार करत होते. एकाच वेळी या सर्व ड्रोन्सच्या लाईट्स बदलत होत्या. कधी तिरंगा तर कधी केवळ केशरी, हिरवा आणि पांढऱ्या रंगात दिसणारे हे ड्रोन्स राजपथावर जणू सैनिकांप्रमाणे पथसंचलन करत होते असा भास होत होता.

सध्या सोशल नेटवर्किंगवर या ड्रोन्सचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. दिल्लीच्या आकाशामध्ये असं दृष्य पहिल्यांदाच पाहणारे अनेक दिल्लीकर थांबून या ड्रोन्सचे व्हिडीओ शूट करतानाचे चित्र पहायला मिळालं.

१)

२)

३)

४)

५)

“लसी पोहचवण्यापासून ते ‘बिटिंग रिट्रिट’दरम्यान राजपथावर रोषणाई करण्यापर्यंत आज ड्रोन वापरले जात आहेत. ड्रोन तंत्रज्ञानाचा हा फार मोठा प्रवास आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून ‘बिटिंग रिट्रिट’दरम्यान राजपथावरील आकाशामध्ये ड्रोन्सच्या सहाय्याने रोषणाई करण्यात येणार आहे,” असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ट्विटरवरुन म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजपथावर रोषणाईसाठी वापरण्यात येणारे हे ड्रोन्स आयआयटी दिल्लीच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. जगामध्ये अशाप्रकारे स्वातंत्र्य उत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी ड्रोन्स वापरणारा भारत हा चौथा देश असल्याचं सांगितलं जातं आहे.