अकोला : यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील राळेगाव येथील १०२ वर्षीय आजोबांनी प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा अनोखा विक्रम रचला. पुखराज उमीचंद बोथरा (१०२) यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावला. या वयातही ते आपले राष्ट्रीय कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील राळेगाव येथील २१४ मतदान केंद्रावर पुखराज उमीचंद बोथरा यांचे मतदान विशेष आकर्षण ठरले. स्वतंत्र भारताच्या १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीत पुखराज बोथरा यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात मोठय़ा हिरिरीने त्यांनी मतदान केले. मतदानासाठीचा त्यांचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा होता.

त्यामुळे प्रशासनाच्यावतीने उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुखराज बोथरा यांचे स्वागत केले. बोथरा यांचा आदर्श सर्वानी घ्यायला हवा, असे हिंगे म्हणाले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 102 year old grandfather voted in every lok sabha election
First published on: 12-04-2019 at 04:20 IST