वृत्तसंस्था, सांतियागो
मध्य चिलीमधील जंगलांमध्ये शुक्रवारपासून लागलेला वणवा सोमवारी सकाळी विझवण्यात यश आल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. या वणव्यात आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप शेकडो लोक बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वयंसेवक या भागातील जळालेले धातूचे अवशेष, फुटलेल्या काचा आणि इतर ढिगारा हटवण्याबरोबर बेपत्ता लोकांचा शोधही घेत आहेत. या वणव्यामुळे व्हिना देल मार या शहराच्या पूर्व भागाला मोठा फटका बसला. त्याशिवाय व्हाल्पारेझो प्रदेशातील क्विल्पे आणि व्हिला अलेमाना या शहरांनाही वणव्याची झळ बसली आहे, असे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी रविवारी सांगितले. या भागातील किमान तीन हजार घरे जळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा >>>आदित्य ठाकरे, अखिलेश यादव हे वाईट समभाग; प्रस्थापितांची जागा कोण घेणार? प्रशांत किशोर स्पष्टच म्हणाले…
शहराभोवती जंगलांमध्ये काही भागात जाणीवपूर्वक आग लावली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर, शुष्क हवामान, जोरदार वाहणारे वारे आणि हवेतील कमी आद्र्रता यामुळे आग वेगाने पसरली असल्याचे राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी सांगितले.
या वणव्यामुळे व्हिना देल मार या शहराच्या पूर्व भागाला मोठा फटका बसला. त्याशिवाय व्हाल्पारेझो प्रदेशातील क्विल्पे आणि व्हिला अलेमाना या शहरांनाही वणव्याची झळ बसली आहे असे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी रविवारी सांगितले. या भागातील किमान तीन हजार घरे जळाल्याची माहितीही त्यांनी दिली. व्हिना देल मार या शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख इतकी असून तेथील किमान ३७० जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती महापौर माकारेना रिपामोन्ती यांनी दिली. तर, आतापर्यंत सापडलेले अनेक मृतदेह ओळख पटण्याच्या स्थितीत नसल्याचे न्यायवैद्यक अधिकारी मारिसोल प्रादो यांनी सांगितले.