ऊटीमध्ये १३ वर्षीय मुलीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. ही एक शाळकरी मुलगी ऊटी म्युनिसिपल उर्दू मिडल स्कूलमध्ये शिकत होती. लोहाच्या गोळ्या खाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार ती तिच्या मित्रांसोबत एक खेळ खेळत होती. ज्यामध्ये तिला जास्तीत जास्त Iron tablets खाण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. या गोळ्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये ठेवल्या होत्या. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी या मुलीने तब्बल लोहाच्या ४५ गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांनी तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या मुलीचं नाव फातिमा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फातिमा ज्या ५ मित्रांसोबत खेळत होती त्यांनादेखील या गोळ्या खाल्याने चक्कर आली होती. या मुलांना चक्कर आल्यामुळे त्यांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ५ विद्यार्थ्यांमध्ये २ मुलं आणि ३ मुली सहभागी होत्या. मुलं बरी होऊन घरी परतली आहेत कारण त्यांनी कमी गोळ्या खाल्ल्या होत्या. परंतु मुलींना उपचारांसाठी कोईंबतूर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

रुग्णालयात जाताना झाला मृत्यू

मीडिया रिपोर्ट्सनुसार फातिमाची तब्येत बिघडल्यानंतर तिला लगेच चेन्नईमधल्या स्टेनली मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारची आहे. जिल्हा मुख्य दंडाधिकारी ए. मुनिस्वामी यांनी सांगितलं की, ६ विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये शिरून लोहाच्या गोळ्यांचा बॉक्स घेतला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना सर्वाधिक गोळ्या खाण्याचं चॅलेंज दिलं. त्यानंतर सर्व मुलांनी गोळ्या खाण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> ‘या’ मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेत

फातिमाने तब्बल ४५ गोळ्या खाल्ल्या

दोन मुलांनी केवळ २-२ गोळ्या खाल्ल्या तर इतर तीन मुलींनी प्रत्येकी १० गोळ्या खाल्ल्या. फातिमाने मात्र तब्बल ४५ गोळ्या खाल्ल्या. फातिमाची आई शाळेत उर्दू शिकवते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या आयर्न टॅब्लेट्स इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा दिल्या जातात. यासाठी एका नोडल टीचरची नेमणूक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 year old ooty girl dies after eating 45 iron tablets in bet asc
First published on: 10-03-2023 at 18:54 IST