scorecardresearch

झारखंडमधील धनबाद येथे इमारतीला भीषण आग, १४ जणांचा मृत्यू; १२ जण गंभीर जखमी

आगीचे कारण अद्याप समोर आलं नाही.

Dhanbad fire
झारखंडमधील धनबाद येथील इमारतीला भीषण आग, १४ जणांचा मृत्यू; १२ जण गंभीर जखमी

झारखंडमधील धनबाद येथे भीषण आगीची घटना समोर आली आहे. धनबाद येथील आशीर्वाद या इमारतीत आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेल्या या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यााठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

धनबाद येथील मोड पोलीस ठाणे परिसरात शक्ती मंदिराजवळ आशीर्वाद ही इमारत आहे. सायंकाळच्या सुमारास या इमारतीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निमशन दलाच्या गाड्या आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे.

पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितलं, “इमारतीत लग्न कार्य सुरु होतं. पण, आगीचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहे,” अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं की, “धनबाद येथील आशीर्वाद इमारतीत लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दु:खद आहे. जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत,” अशी माहिती मुख्यमंत्री सोरेन यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 23:08 IST