Delhi Rape Crime News : देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका १५ वर्षीय मुलीने तिच्या ट्यूशन शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. मुलीने बुधवारी तिच्या वडिलांसह याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

दक्षिण दिल्लीतील चित्तरंजन पार्क भागात राहाणाऱ्या मुलीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे की, २०२२ पासून म्हणजेच गेली तीन वर्ष ती या ट्यूशन सेंटरमध्ये क्लासेस घेत आहे. तिने पुढे असा आरोप केला की, या काळात त्या शिक्षकाने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, तिला धमकावले आणि भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल देखील केले.

तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४ (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर बलात्कार

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली आहे. या प्रकरणी सर्व स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आरोपीचा शोध घेण्याकरिता पुणे पोलिसांनी १ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.