सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १८ भारतीय आहेत. या स्फोटामध्ये १३० जण जखमी झाले आहेत. सुदानमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी सुदानच्या बाहरी भागात असणाऱ्या सीला सिरॅमिक कारखान्यातील स्फोटानंतर १६ भारतीय बेपत्ता झाले होते. १८ जणांचा मृत्यू झाल्याचे भारतीय दूतावासाने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

बेपत्ता असलेले काही जण मृतांच्या यादीमध्ये असू शकतात. मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण आहे. या स्फोटानंतर दूतावासाने बेपत्ता झालेले, रुग्णालयात दाखल असलेले तसेच बचावलेल्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. दूतावासाच्या माहितीनुसार सात जण रुग्णालयात असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.

बचावलेल्या ३४ भारतीयांची सलुमी सिरॅमिक फॅक्टरीच्या कारखान्यात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटनास्थळी सुरक्षेची आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 indians killed in factory fire in sudan dmp
First published on: 04-12-2019 at 17:53 IST