आंध्र प्रदेश सरकारने यंदाच्या खरिपाच्या हंगामात सात जिल्ह्य़ांतील १९६ महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे. दुष्काळ पाहणीसाठी नियुक्त केलेल्या समितीने केलेल्या शिफारशी व जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेले अहवाल याची तपासणी केल्यानंतर १९६ महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. श्रीकाकुलम, प्रकासम, नेलोर, चित्तूर, कडप्पा, अनंतपूर व कुर्नूल जिल्ह्य़ांमधील ही महसूल मंडळे आहेत. यांपैकी बहुसंख्य दुष्काळग्रस्त मंडळे रायलसीमा भागातील कुर्नूल, कडाप्पा, चित्तूर आणि अनंतपूर येथील तर उर्वरित तटवर्ती जिल्ह्य़ातील आहेत. निकषांप्रमाणे मदतकार्य करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यंदा नेहमीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
आंध्रात १९६ महसूल मंडळे दुष्काळग्रस्त
आंध्र प्रदेश सरकारने यंदाच्या खरिपाच्या हंगामात सात जिल्ह्य़ांतील १९६ महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 29-10-2015 at 00:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 196 revenue commission suffer from loss in ap