दिल्लीत अपघाती निधन झालेले केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे प्रवास करताना नेहमी ‘टोयोटा’ कंपनीची ‘लेक्सस’ गाडी वापरत असत आणि दर तीन वर्षांनी मुंडे पांढऱया रंगाची नवी ‘लेक्सस’ गाडी घेत असत. पण, मंगळवारी दिल्ली विमानतळावर जाताना गोपीनाथ मुंडे ‘एसएक्स ४’ गाडीतून प्रवास करत होते.
घातपाताच्या शक्यतेची गुप्तचर विभागाकडून तपासणी
या वर्षाच्या सुरूवातीला ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत गोपीनाथ मुंडे यांना अपघात आणि ते या समीकरणावर विचारले असता ते म्हणाले होते, “एका अपघातात माझ्या मानेला जबर दुखापत झाली होती. तेव्हापासून मला मानेचा त्रास असल्यामुळे ‘टोयोटा’ची ‘लेक्सस’ गाडी मी वापरु लागलो. ‘लेक्सस’ गाडी मला सुरक्षित आणि आरामदायी वाटते. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून मी लेक्सस गाडी वापरतो आहे.” तसेच आतापर्यंत चार ‘लेक्सस’ गाड्या बदलल्या असून, दर तीन वर्षांनी माझी ‘लेक्सस’ गाडी बदलत असते, असेही मुंडे यांनी सांगितले होते.
मुंडे आणि अपघात हे समीकरणच..
मात्र, मंगळवारी सकाळी गोपीनाथ मुंडे ‘लेक्सस’ ऐवजी दुसऱया गाडीतून नवी दिल्ली विमानतळावर जात असताना त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात मुंडे यांचे निधन झाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2014 रोजी प्रकाशित
नेहमीची ‘लेक्सस’ सोबत नसताना मुंडेंवर काळाचा घाला!
दिल्लीत अपघाती निधन झालेले केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे प्रवास करताना नेहमी 'टोयोटा' कंपनीची 'लेक्सस' गाडी वापरत असत आणि दर तीन वर्षांनी मुंडे पांढऱया रंगाची नवी 'लेक्सस' गाडी घेत असत.
First published on: 04-06-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1990s 2007 accidents made munde switch to safe lexus