दक्षिण आफ्रिकेतून आणलेले चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत. यातील एका मादी चित्त्याने २४ मार्चला चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यामधील एका बछड्याचा २३ मेला मृत्यू झाला होता. तर, गुरुवारी ( २५ मे ) दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. चित्त्यांच्या मृत्यूची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

कुनो राष्ट्रीय उद्यानात असलेल्या मादी चित्ता ज्वाला हीने २४ मार्च २०२३ ला चार बछड्यांना जन्म दिला होता. मादी चित्त्यांमध्ये ज्वाला हीनेच बछड्यांना पहिल्यांदा जन्म दिला आहे. पण, २३ मे रोजी उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस होता. त्यामुळे चारही बछड्यांना उष्माघाताची समस्या जाणवली. याची माहिती मिळताच कुनो उद्यानातील प्राणी मित्रांनी बछड्यांना उपचारासाठी दाखल केलं होतं.

एका बछड्यावर रुग्णालयात उपचार सुरू

पण, यातील एका बछड्याचा २३ मे रोजी मृत्यू झाला. तर आज ( २५ मे ) दोन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका बछड्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर पालपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, ‘ज्वाला’ या मादी चित्त्यावरही प्राणीमित्रांकडून देखरेख करण्यात येत आहे.

हेही वाचा : अन्वयार्थ: चित्ता-मृत्यूंची चिंता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन चित्त्यांसह ३ बछड्यांचा मृत्यू…

दरम्यान, कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून २० चित्ते आणले होते. यातील तीन चित्त्यासह ३ बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता २३ एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा ९ मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता ‘ज्वाला’ या मादीच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.