ढाका : ईशान्य बांगलादेशातील किशोरगंज जिल्ह्यात सोमवारी एका प्रवासी रेल्वेगाडीची मालगाडीशी धडक होऊन झालेल्या अपघातात किमान वीस जण ठार, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चट्टोग्रामकडे निघालेल्या मालगाडीने राजधानी ढाक्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या किशोरगंज जिल्ह्यातील भैरव भागात दुपारी साडेतीनच्या सुमारास ढाक्याला जाणाऱ्या एगारोसिंदूर गोधुली एक्स्प्रेसच्या मागच्या डब्यांना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा >>> जेएनयूच्या आवारात प्रथमच रा. स्व. संघाचे पथसंचलन; विद्यार्थी संघटनांची कारवाईची मागणी 

 ‘आतापर्यंत २० मृतदेह हाती लागले आहेत. आम्ही बचावकार्यात शक्य ते सर्व सहकार्य करत आहोत’, असे रॅपिड अ‍ॅक्शन बटालियनचा एक अधिकारी म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 प्रवासी गाडीचे तीन डबे उलटलेल्या स्थितीत असून, छिन्नविच्छिन्न झालेल्या डब्यांखाली अनेक जण अडकले असल्याची भीती असल्याचे घटनास्थळावरील अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुमारे १०० जखमी प्रवाशांची सुटका करण्यात येऊन त्यांना निरनिराळय़ा रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.  बचाव मोहिमेत आणखी मृतदेह व जखमी प्रवासी आढळण्याची शक्यता असल्याचे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पत्रकारांना सांगितले. बचावकार्यासाठी क्रेनसह एक गाडी अपघातस्थळी पोहोचली आहे.