Pakistani Arrested : कॅनडातील अधिकाऱ्यांनी बुधवारी २० वर्षांच्या पाकिस्तानी तरुणाला ( Pakistani Arrested ) अटक केली आहे. मोहम्मद शाहजेब खान असं या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर अमेरिकेत मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलिन या ठिकाणी असलेल्या ज्यूईश सेंटरवर हा हल्ला घडवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे.

शाहजेब जादून या नावाने ओळखला जातो हा तरुण

मोहम्मद शाहजेब खानला शाहजेब जादून ( Pakistani Arrested ) या नावानेही ओळखलं जातं. तो ISIS चा कट्टर समर्थक असल्याचीही माहिती समोर आली आहे. यूएस-कॅनडाच्या सीमेपासून अवघ्या १९ किमी अंतरावर या तरुणाला अटक करण्यात आली. इस्रायलमध्ये हमासने हल्ला केल्याला ऑक्टोबर महिन्यात एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ७ ऑक्टोबरला अमेरिकेत मोठा हल्ला घडवण्याचा कट या तरुणाने रचला होता. त्यासाठी ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक शस्त्रं वापरण्यात येणार होती अशीही माहिती समोर आली आहे. द प्रिंट ने हे वृत्त दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा तरुण ९/११ प्रमाणे हल्ला करण्याचा कट आखत होते. या प्रकरणी या तरुणाला अटक ( Pakistani Arrested ) करण्यात आली.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Nitin GAadkari
Nitin Gadkari : दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल वाहनांच्या दरात मिळतील : नितीन गडकरी
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?

Pakistan Deputy PM Ishaq Dar: “पाकिस्तान ‘त्या’ एक कप चहाची किंमत चुकवतोय”, उपपंतप्रधान इशक दार यांची आगपाखड, तीन वर्षांपूर्वीच्या घटनेचा केला उल्लेख!

ऑटोमॅटिक हत्यारांद्वारे हल्ला करण्याची तयारी

खान या तरुणाने ( Pakistani Arrested ) AR स्टाईलची शस्त्र, दारुगोळा आणि इतर सगळ्या गोष्टी याबाबत खानने दोन अंडरकव्हर एजंट्सशी चर्चा केली होती. त्यांनी सर्वात मोठा हल्ला घडवण्याचा कट आखला होता. ही माहिती मिळाल्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली. ज्यू लोकांना ठार करायचं असेल तर न्यूयॉर्क ही उत्तम जागा आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्यू लोकांचं वास्तव्य आहे, त्यामुळे तिथे हल्ला घडवण्याचा कट आखल्याचीही माहिती समोर येते आहे.

मोहम्मद शाहजेब खान आयसिसचा समर्थक

मोहम्मद शाहजेब खान ( Pakistani Arrested ) हा आयसिसचा कट्टर समर्थक आहे. त्याला ओर्म्स या ठिकाणाहून त्याला अटक करण्यात आली आहे. कॅनडाने त्याच्यावर तीन आरोप लावले होते. खानच्या विरोधात चौकशी सुरु आहे, त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला २० वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. अटॉर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी म्हटलं आहे की शाहजेबने ७ ऑक्टोबरला हल्ला घडवण्याचा कट रचला होता. न्यूयॉर्कमध्ये हा दहशतवादी हल्ला घडवण्यात येणार होता अशी माहिती मिळते आहे.