रस्त्यावरुन चालताना किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर असताना कानाला इअरफोन लावून मोबाइलवर गाणी ऐकू नका असे विविध माध्यमातून वारंवार आवाहन केले जाते. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा या सूचनांकडे केले जाणारे दुर्लक्ष जीवावर बेतू शकते. मध्य प्रदेशात अशीच एक ह्दयद्रावक घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानाला इअर फोन लावून गाणी ऐकण्यात गुंग झालेल्या एका २० वर्षीय युवकाचा ट्रेन खाली येऊन मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील सुखी सिवानीया भागात ही दुर्देवी घटना घडली. सुनील यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो भाडभाडा गावात रहायला होता. बुधवारी सुनील नेहमीप्रमाणे आपल्या गुरांना घेऊन रेल्वे रुळानजीकच्या परिसरात गेला होता. त्यावेळी ट्रेन खाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा सुनीलचा मृतदेह रुळावर पडलेला होता. त्याच्या कानामध्ये इअरफोन होते. सुनील नेहमीच रेल्वे रुळालगतच्या परिसरात गुरांना चरण्यासाठी घेऊन जायचा असे तपास अधिकारी भानू प्रताप यांनी सांगितले. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास तो घरातून निघाला होता. गाणी ऐकण्यात गुंग झाल्यामुळे त्याला ट्रेनचा अंदाज आला नाही आणि ट्रेन खाली येऊन त्याचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 year old run over by train while listening to music
First published on: 25-10-2018 at 15:27 IST