गुजरात एटीएसने (Gujarat ATS) अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल २०० कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये ४० किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याची माहिती गुजरात एटीएला मिळाली होती. या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा- बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेची धमकी; कुणाल कामराचे ‘या’ राज्यातील शो रद्द

१२ गिअर बॉक्समध्ये अंमली पदार्थ लपवण्यात आले

मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरात एटीएसने अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईवरून आणलेले हे ड्रग्ज गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. गुजरात एटीएसला या प्रकरणाची माहिती मिळाली होती. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ गिअर बॉक्समध्ये हे अंमली पदार्थ लपवण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.

हेही वाचा- हैदराबाद : हिमंता बिस्वा शर्मा यांच्या रॅलीत गोंधळ; मंचावर चढून ‘टीआरएस’ कार्यकर्त्याने माईक ओढला

ड्रग्ज बॉक्सची ओळख पटण्यासाठी पांढऱ्या रंगाची खूण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्च्युरी कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये ‘गिअर बॉक्स’ मोहीम राबवण्यात आली होती. अतिशय चलाखीने हे माफिया भारतात ड्रग्ज आणत असल्याची माहिती समोर आली आहे. ३६ गिअर बॉक्सपैकी ड्रग्ज बॉक्सची ओळख पटण्यासाठी १२ गिअर बॉक्सला पांढऱ्या रंगाची खूण करण्यात आली होती. मात्र, अद्याप ही कारवाई पूर्ण झाली नसून इतर गिअर बॉक्स तपासण्यात येत असल्याची माहिती कोलकाता पोलीस महानिरिक्षक भाटिया यांनी दिली आहे.