महाराष्ट्रातही सोळा संस्था बेकायदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात एकूण २७७ बनावट व बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यांतील ६६ दिल्लीत आहेत, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री सत्यपाल सिंह यांनी सोमवारी लोकसभेत दिली. त्यांनी सांगितले की, तेलंगण, पश्चिम बंगाल या राज्यांत अनुक्रमे ३५ व २७ बनावट अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

कर्नाटक २३, उत्तर प्रदेश २२, हरयाणा १८, महाराष्ट्र १६ व तमिळनाडू ११, दिल्ली ६६,  हिमाचल प्रदेश १८, बिहार १७, गुजरात ८, आंध्र ७, चंडीगड ७, पंजाब ५, राजस्थान ३, उत्तराखंड ३ याप्रमाणे बनावट अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण मंडळ म्हणजे एआयसीटीईच्या मान्यतेशिवाय या संस्था चालवल्या जात असून त्या बेकायदेशीर व बनावट आहेत.

लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सिंह यांनी म्हटले आहे की, या संस्थांना एक तर एआयसीटीईची परवानगी घ्यावी किंवा महाविद्यालये बंद करावीत असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत. बनावट शिक्षण संस्थांविरोधात कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने याप्रकरणी दिले असून आयोगाच्या संकेतस्थळावर २४ बोगस विद्यापीठांची यादी आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 277 fake engineering colleges in india
First published on: 02-08-2018 at 01:14 IST