नोएडा येथील सेक्टर-५० मध्ये राहणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू होती. या छापेमारीत आतापर्यंत खासगी बेनामी लॉकरमधून ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. घराच्या तळघरात बांधलेल्या या खासगी लॉकर्सपैकी एका लॉकरमध्ये सुमारे दोन कोटी रुपये आणि उर्वरित दोन लॉकरमधील ३० ते ३५ लाख रुपये आयकर विभागाच्या पथकाने जप्त केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे तिन्ही लॉकर सोमवारी रात्री उशिरा तोडण्यात आले असून, आणखी दोन संशयास्पद लॉकर लवकरच फोडले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-५० येथील या घरात आर.एन. सिंह यांचा मुलगा सुयश आणि त्याचे कुटुंबीय राहतात. माजी आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी मिर्झापूर येथे राहतात. आयकर विभागाच्या पथकाने माजी आयपीएस अधिकारी आर.एन. सिंह यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड ठेवल्याच्या माहितीच्या आधारे शनिवारी छापा टाकला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 crore rupees found in income tax raid at former ips officer rn singh hrc
First published on: 01-02-2022 at 16:20 IST