हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. तेलंगाणा पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. हे तीन जण लष्कर-ए-तोयबासाठी काम करत होते. दसऱ्याच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट आणि आरएसएस, भाजपाच्या बैठकीत ग्रेनेड हल्ला करण्याची योजना यांनी आखली होती.

मोहम्मद अब्दुल जाहेद उर्फ मोटू ( रा. मूसरामबाग ), मोहम्मद समीउद्दीन ( रा. मलकपेठ ) आणि माझ हसन फारूख ( रा. हुमायून नगर ) या तिघांना जुना हैदराबाद परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये अन्य चार जणांची नावे असून, ते अद्याप फरार आहेत.

हेही वाचा – मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते…, शशी थरुर यांचं मोठं विधान

संशयित आरोपींकडून चार ग्रेनेड, चार लाख रुपये आणि काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. आरएसएस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. दहशत पसरवणे आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

यातील आरोपी जाहेदने सांगितलं की, तो हैदराबादचे तीन फरारी संशयित दहशतवादी फरहतुल्ला घोरी, सिद्दीक बिन उस्मान आणि अब्दुल मजीद यांच्या संपर्कात होता. हे तीघे पाकिस्तानमधून आयएसआयसाठी काम करत आहेत.

हेही वाचा – महात्मा गांधींना दाखवलं राक्षसाच्या रुपात; हिंदू महासभेच्या देखाव्यावरुन नवा वाद, आयोजक म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसआयटी अधिकाऱ्याने म्हटलं की, जाहेद आणि त्याचे सहकारी सणासुदीच्या काळात दहशत निर्माण करणार होते. तसेच, त्यांच्या निशाण्यावर आरएसएस आणि भाजपाच्या सभा होत्या. यासाठी पाकिस्तानमधून निधी पुरवण्यात आला होता.