4-Year-Old child sleeping next to grandmother kidnapped sexcual assaulted in west bengal Crime News : महिला अत्याचाराच्या घटनेने पश्चिम बंगाल राज्य पुन्हा एकदा हादरले आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी येथे, चार वर्षांच्या मुलीचे तिच्या पालकांच्या शेजारी झोपलेली असताना कथितपणे तिचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तारकेश्वर रेल्वे स्टेशनच्या परिसरात शुक्रवारी घडली. येथे या चिमुरडीचे कुटुंबाने आश्रय घेतला होता. या प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कुटुंबाने आरोप केला की मुलीला तिची मच्छरदाणी कथितपणे फाडून ती झोपेत असतानाच उचलून नेण्यात आले आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
पहाटे मूल बेपत्ता असल्याचे आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक तास शोध घेतल्यानंतर नातेवाईकांना ती मुलगी दुपारी स्टेशनच्या बाजूला एका गटाराच्या जवळ आढळून आली.
“मूल तिच्या आजीच्या शेजारी मच्छरदाणीत झोपले होते, तेव्हा आरोपीने कथितरित्या मच्छरदाणी कापून तिला उचलून नेले. अनेक तास शोध घेतल्यानंतर, ती एका गटाराजवळ रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत, विवस्त्र आणि गालावर चावल्याच्या खुणांसह आढळून आली. अनेक तास उपचार करूनही, तिच्या गुप्तांगातून अजूनही रक्तस्राव होत आहे,” असे भाजपच्या आरामबाग जिल्ह्याच्या सचिव पर्णा आदक यांनी सांगितले.
पोलिसांनी या मुलीला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले, यावेळी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत परिसरात गर्दी केली. त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर टीका करत त्या अपयशी मुख्यमंत्री असल्याचे म्हटले.
एका चार वर्षांच्या मुलीवर बतारकेश्वर येथे बलात्कार झाला. कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली, पण एफआयआर दाखल केला नाही. रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून चांदनगर येथे पाठवण्यात आले. तारकेश्वर पोलीस गुन्हा दडपण्यात व्यस्त आहेत. हा ममता बॅनर्जी यांच्या फ्री-फॉर-ऑल राजवटीचा खरा चेहरा आहे. चिमुरडीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, अजूनही पोलीस सत्य दडपून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बनावट प्रतिमेचे रक्षण करत आहेत. ते पोलीस अधिकारी आहेत की ममता बॅनर्जींचे खुषमस्करी करणारे? तारकेश्वर पोलीस त्यांनी घेतलेली कायद्याची अंमलबजावणी करण्याची शपथ विसरलेले दिसत आहेत. ममता बॅनर्जी, तुम्ही एक अपयशी मुख्यमंत्री आहात,” असे अधिकारी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.”
तर तारकेश्वरचे आमदार रामेंदू सिंह रॉय यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी रेल्वे पोलिसांकडून राहिलेली सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता नमूद केली आहे. दरम्यान बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
