62 Year Old Man Raped Minor Granddaughter: २०२१ मध्ये अल्पवयीन नातीवर बलात्कार केल्याबद्दल केरळ न्यायालयाने बुधवारी एका ६२ वर्षीय व्यक्तीला दोषी ठरवून एकूण १११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र त्याला शिक्षा म्हणून जास्तीत जास्त ३० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे समजतेय. कोर्टाने दोषीला २.१ लाखाचा दंड देखील ठोठावला आहे, हा गुन्हा डिसेंबर २०२१ मध्ये झाला होता जेव्हा इयत्ता चौथीमध्ये शिकणारी मुलगी ख्रिसमसच्या सुट्टीत तिच्या आजोबांना (व्हेट्रोमल्ला अब्दुल) यास भेटायला गेली होती.
सरकारी वकील (पीपी) मनोज अरूर यांनी सांगितले की, नादापुरम फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टाचे (पीओसीएसओ) न्यायाधीश सुहैब एम यांनी आरोपीला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पॉक्सो) कायद्याच्या विविध तरतुदींनुसार एकूण १११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, शिक्षा एकाचवेळी ठोठावण्यात येणार असल्याने तसेच या व्यक्तीला दिली जाणारी तुरुंगवासाची सर्वात जास्त शिक्षा ३० वर्षे असल्याने या प्रकरणात दोषी ३० वर्षे तुरुंगवास भोगेल, असेही मनोज आरूर यांनी सांगितले.
पीटीआयच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर उघड झाला. २०२१ च्या ख्रिसमसच्यावेळी अल्पवयीन चिमुकली आजोबांना भेटण्यासाठी गेली होती. आजूबाजूला कोणी नसताना या व्यक्तीने नातीला ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने नंतर तिला धमकावले व झालेला प्रकार कोणालाही सांगायचा नाही अशी तंबी दिली. मात्र पीडित चिमुकलीने याबाबत आपल्या शाळेतील मित्राला सांगितलं आणि मग ही माहिती चाइल्ड सर्व्हिसेसला कळविण्यात आली ज्यांनी पोलिसांना माहिती दिली व पुढील कारवाई करण्यात आली.
दरम्यान, हे मागील काही दिवसांमधील दुसरे समान प्रकरण असल्याचे समजतेय. काही दिवसांपूर्वीच केरळच्या मल्लापुरम भागातील एका ४२ वर्षीय व्यक्तीला आपल्या अल्पवयीन लेकीवर बलात्कार केल्याप्रकरणी १५० वर्षांची एकत्रित शिक्षा सुनावण्यात आली होती. हा गुन्हा २०२२ मध्ये झाला असून दोषीने त्याच्या तीन पत्नींपैकी एकीच्या पोटी जन्मलेल्या सर्वात लहान अल्पवयीन मुलीवर त्याने त्याच्या जवळच्या घरी वारंवार बलात्कार केल्याचा आरोप होता.
हे ही वाचा<< आधी लुबाडलं, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला मग ‘जय श्री राम’ म्हणण्यासाठी चक्क..भायखळाच्या पुलावरील भीषण प्रकार
पेरिंथलमन्ना फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट-II चे न्यायाधीश सिनी एसआर यांनी त्या व्यक्तीला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) करणारा कायदा, IPC आणि बाल न्याय कायद्याच्या तरतुदींनुसार एकूण १५० वर्षांसाठी दोषी ठरवून वेगवेगळ्या शिक्षा सुनावल्या. मात्र वरील प्रकरणातील निकषानुसार, न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या आदेशानुसार दोषीला पुढे ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.