scorecardresearch

VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू

VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील जलपायगुडी जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू झाला आहे. देवीचं विसर्जन करण्यासाठी जमले असताना नदीला अचानक पूर आल्याने लोक त्यात वाहून गेले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, लोक वाहून जाताना दिसत आहेत. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीच्या विसर्जनसाठी माल नदीच्या काठावर आलेल्या सातजणांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. तर सातजण अद्यापही बेपत्ता आहेत.

घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सात मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध अद्यापही सुरु आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या