छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात शेण चोरी होण्याची विचित्र घटना घडली आहे. छत्तीसगड पोलिसांना कोरबामधील एका गावातून ८०० किलो शेण चोरून नेल्याची तक्रार मिळाली. कोरबा जिल्ह्यातील पोलिसांनी गुन्हा नोंदवून चोरांचा शोध सुरू केला आहे. दिपका पोलीस स्टेशन परिसरातील धुरेना गावात ८ ते ९ जून रोजी मध्यरात्री ८०० किलो शेण चोरीला गेले. त्याची किंमत सुमारे १६०० रुपये आहे.  गोधन ग्रामिण समितीचे अध्यक्ष कमहनसिंग कंवर यांनी १५ जून रोजी ही औपचारिक तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती दिपका पोलीस स्टेशन परिसर प्रभारी हरीश तांडेकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कमहनसिंग कंवर म्हणाले, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेचे निवेदनही घेतले आहे आणि घटनेबाबत आसपासच्या ग्रामस्थांचीही चौकशी केली आहे.

हेही वाचा- “हे म्हणजे नौटंकी, पोटात अन्न नाही तो योग कसा करेल?”, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांचे ताशेरे

छत्तीसगड सरकारने गांडूळ कंपोस्ट उत्पादनासाठी ‘गोधन न्याय योजना’ सुरू केली. त्याअंतर्गत शेण २ रुपये किलोच्या आधारे विकत घेतले जाते. ही योजना सरकारने २० जुलै रोजी हरेली उत्सवाच्या निमित्ताने सुरू केली होती. यामध्ये सुरुवातीला पशुपालकांकडून दीड रुपये प्रतिकिलो दराने शेण खरेदी करण्याची योजना होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 800 kg of dung stolen chhattisgarh police are conducting a search srk
First published on: 21-06-2021 at 15:36 IST