छेडछाडीला कंटाळून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तरुणीने आपल्या शरिरावर सुसाइड नोट लिहिली होती, ज्यामध्ये आपल्या आत्महत्येसाठी स्थानिक तरुण जबाबदार असल्याचा आरोप तिने केला. २० वर्षीय तरुणीने लिहिलं आहे की, ‘माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. यासाठी शेजारी गावातील संजय उर्फ संजू, त्याची वहिनी रुबी आणि त्याचा मित्र सोनू जबाबदार आहे. या लोकांना शिक्षा द्या आणि फाशी होईल असा प्रयत्न करा’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तरुणीसोबत दोन तरुणांनी छेडछाड केली होती. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तक्रार आणि पीडित तरुणीच्या शरिरावर लिहिण्यात आलेल्या सुसाइड नोटच्या आधारे वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl committed suicide because of eve teasing
First published on: 20-03-2018 at 13:16 IST