आपल्या आकाशगंगेचे वस्तुमान अंदाजे आपल्या सूर्याच्या ७०० अब्ज पट अधिक असावे, असे संशोधकांचे मत आहे. आकाशगंगेचा अभ्यास नव्याने करण्यात आला असून सूर्याचे वस्तुमान दोन नॉनिलियन (म्हणजे २ वर तीस शून्ये) किलो इतके आहे. याचाच अर्थ सूर्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ३३०००० इतके पट आहे. आपली आकाशगंगा ही मोठी आकाशगंगा नाही असे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठाचे ग्वेडोलिन एडी यांनी सांगितले. आपल्या आकाशगंगेचे वस्तुमान मोजणे फार अवघड असते असे संशोधकांचे म्हणणे आहे. आकाशंगगा किंवा दीर्घिकेत केवळ तारे, ग्रह, चंद्र, वायू , धूळ किंवा इतर पदार्थ असतात असे नसून त्यात इतरही अनेक घटक असतात जे कृष्ण वस्तुमानात भर टाकीत असतात. कृष्णद्रव्य हे अजून गूढ असून ते दिसत नाही. त्याची फारशी माहिती अजून उपलब्ध नाही व ते प्रयोगशाळेत तयार करता आलेले नाही किंवा सापडलेले नाही. खगोल वैज्ञानिक व विश्वरचना शास्त्रज्ञ यांच्या मते दृश्य वस्तूंवर गुरुत्वीय परिणाम तपासून कृष्णद्रव्याचे अस्तित्व सांगता येऊ शकेल. मॅकमास्टर येथील पीएचडीची विद्यार्थिनी एडी यांनी आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या तारकासमूहांचा वेग मोजून आपल्या आकाशगंगेचे वस्तुमान काढले आहे त्याचा कृष्णद्रव्याचा भागही तपासल्याचा दावा केला आहे. तारकासमूहांच्या कक्षा दीर्घिकेच्या गुरुत्वावर अवलंबून असतात. त्या कृष्णद्रव्याच्या वस्तुमानावरही ठरते. एडी हिच्या संशोधनानुसार ग्लोब्युलर क्लस्टर व्हेलॉसिटीज तंत्राने वस्तुमान काढता येते. ग्लोबल क्लस्टरचा वेग दोन दिशांनी मोजतात, एक आपल्या दृष्टीच्या समांतर रेषेत व दुसरा आकाशाच्या प्रतलाच्या रुंदीच्या रेषेत. संशोधकांच्या मते आपल्या आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या ग्लोबल क्लस्टर्सचा वेग अचूकपणे मोजता आलेला नाही पण एडीच्या मते ज्यांचे वेग अंशत: माहिती आहेत व ज्यांचे पूर्ण माहिती आहेत त्यांच्या एकत्रित वापराने दीर्घिकेचे वस्तुमान सांगता येते. दीर्घिकेच्या केंद्रापासून एखाद्या अंतरावरचे वस्तुमान तिने शोधलेल्या पद्धतीने सांगता येते. अर्थात यात अजून अनिश्चितता असून अॅस्ट्रोफिजीकल जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jun 2016 रोजी प्रकाशित
आकाशगंगेचे वस्तुमान सूर्याच्या ७०० अब्ज पट अधिक
आपल्या आकाशगंगेचे वस्तुमान अंदाजे आपल्या सूर्याच्या ७०० अब्ज पट अधिक असावे

First published on: 06-06-2016 at 01:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new study claims milky way has a mass of 700 billion suns